भुसावळ लोहमार्गचे एएसआय भरत शिरसाठ यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत एएसआय भरत शिरसाठ यांना पोलिस खात्यात केलेल्या २९ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेमुळे पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह (बोधचिन्ह) जाहीर झाले आहे. शिरसाठ यांना सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने लोहमार्ग पोलिस दलातील कर्मचार्‍यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिरसाठ यांनी यापूर्वी नंदुरबार, मनमाड लोहमार्ग तसेच भुसावळ लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेत सेवा बजावली आहे तर आता ते भुसावळ लोहमार्ग पोलिसात एएसआयपदी कार्यरत आहेत. शिरसाठ यांना लोहमार्ग निरीक्षक दिनकर डंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *