पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव आकाशवाणी केंद्रावर मुलाखत ;

जळगाव, – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची तयारी’ या विषयावर मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, दि. ३० एप्रिल, २०२० रोजी सकाळी ठिक ७.२५ वाजता प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीत पालकमंत्री ना. पाटील यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शासन व जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कामकाज, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विभागाने आखलेल्या उपाययोजनांसह लॉकडाऊनच्या काळात जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणार आहे. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत गुरुवार ३०एप्रिल, २०२० रोजी सकाळी ठिक ७.२५ मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणीवर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *