भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर बुधवार २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील नगरपालिका दवाखाना,सर्व पोलिस स्टेशन आणि प्रांताधिकारी कार्यालय तसेच शहरातील इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये आणी मोठ्यां दवाखान्यातील कर्मचाऱ्यांकरिता रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांच्यातर्फे २०० पीपीई किट्स , ३००० मास्क आणि ५ लिटरच्या १० बाॕटल सॕनिटायझरचे वितरण करण्यात आले.
दरम्यान भुसावळ शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आज झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या चर्चेतून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी उद्या दिनांक ३० एप्रिलच्या रात्री १२ पासून ३ दिवस स्वयंस्फूतीने जनता कर्फ्यु पाळून कडकडीत बंद ठेवावे असे आवाहन यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे. या तीन दिवसात फक्त दवाखाने व मेडिकल सेवा सुरु राहतील असेही यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले .
यावेळी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे , भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,शिवसेनेचे शहर प्रमुख (उत्तर विभाग ) निलेश महाजन, भाजपा शहर सरचिटणीस पवन बुदेंले ,आणि मोजके भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून पीपीई किट्स , सॕनिटायझर व इतर वैद्यकिय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भुसावळ शहरात कोरोना संक्रमणाची वाढती संख्या पाहता यावेळी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते .
उदयापासुन तीन दिवस भुसावळ बंद ; लाॕकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करा – आ.संजय सावकारे ;
दरम्यान भुसावळ शहरवासियांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी भुसावळकरानी तीन दिवस जनता कर्फ्यु स्वयंस्फुर्तिने पाळा तसेच लाॕकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करा , विनाकारन बाहेर निघू नका शक्यतो घरातच रहा , असेही आवाहन आमदार संजय सावकारे यांनी यावेळी केले .



