नवी मुंबई :
जीवघेण्या “कोरोना विषाणू”च्या संकटा मुळे देशभरासह महाराष्ट्र राज्यात २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या “लॉकडाउन”काळात नेरुळ भागातील गरीब आणि गरजू लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी निराधार, गोरगरीबांना अन्नधान्य, किराणा साहित्या यासह जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून विवंचनेत सापडलेल्या लोकांची पोटाची खळगी भरण्याचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य निष्ठावान, कडवट शिवसैनिक तथा शिवसेनेचे नवी मुंबई शहर प्रमुख व माजी नगरसेवक विजय माने गेल्या ३६ दिवसापासून अहोरात्र न थकता सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे “कोरोना “च्या संकटकाळात गरजूना केलेल्या मदत वाटपाचे फोटो काढण्याचे देखील विजय माने स्पष्ट नकार देवून टाळत आहेत.
“कोरोना” मुळे उद्दभवलेल्या “लॉकडाउन” संकटकाळात हातावर पोट घेऊन जगणारे लोक, असंघटित मजूर, नाका कामगार, रोजगारासाठी नवी मुंबईत आलेल्या कुटुंबापासून दूर असलेले लोक, निराधार, जेष्ठ नागरिक अन्नपाण्यापासून वंचीत राहू नयेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी त्यांना अन्नधान्य वाटप, जेवण वाटप, रक्तदान शिबीर, मोफत रुग्णवाहिका सुविधा, शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना भाजीपाला पुरवठा, आदी उपक्रम विजय माने २५ मार्चपासून “सामाजिक बांधिलकी” या भावनेतून राबवित आहेत.विशेष “कोरोना” च्या संकटकाळात वंचीतांना मदत करण्याचे काम विजय माने स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश, सूचना यांचे तंतोतंत पालन करून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या सहकार्याने कार्य करीत आहे.
“कोरोना” च्या अडचणीच्या काळात या आजारापासून बचावासाठी नेरुळ भागात जनजागृती करण्याबरोबरच “कोरोना”चा संसर्ग, संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना मोफत मास्क वाटप, सॅनिटायझर्स वाटप करण्याचे काम घरोघरी जाऊन विजय माने करीत आहेत. संकटकाळात गरजूना मदत करताना “सोशल डिस्टंसिंग”चे उल्लंघन होणार नाही, या समाजिक कार्याची प्रसिद्धी होणार नाही तसेच प्रसिद्धीपासून दूर राहण्याची दक्षता देखील विजय माने कटाक्षाने घेत आहेत.



