शिवपुर कन्‍हाळा येथे पोलीसांची धडक मोहीम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
तालुका पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील शिवपुर कन्‍हाळा येथे तालुका पोलीसांनी धडक मोहीम राबवुन दोन ठिकाणी गावठी हातभट्‍टी दारुचे अड्‍डे उध्‍वस्‍त केले तर संचारबंदी नियमांचा उल्‍लंघन करणा-या दोघांविरुध्‍द गुन्‍हे दाखल केले आहे.
शिवपुर कन्हाळे येथे जाकिर हूसेन गवळी हा गावठी हात भट्टीची दारू गाळण्याचे गुळ,महू, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन हे ६ पत्री ड्रम मध्ये एकुण १ हजार २०० लिटर ३६ हजार रू.किमतीचे व गावठी हात भट्टीची ३५ लिटर तयार दारू असा अंदाजे किंमत ४२ हजार १५० रु किमतीच्‍या मालासह मिळुन आला.
तर शिवपुर कन्हाळ येथेच सलीम हुसेन गवळी रा. कन्हाळा हा त्याच्‍या राहते घरामागे
गावठी हात भट्टीची दारू गाळण्याचे गुळ,महू,नवसागर मिश्रीत कच्चे रसायन ३ पत्री ड्रम मध्ये ६०० लिटर १८ हजार रू. किमतीचे व गावठी हात भट्टीची २५ लिटर तयार दारू असे अंदाजे २० हजार २५० रु किमतीचे मालासह मिळुन आला.या छाप्यात एकुण ९ ड्रम मध्ये १ हजार ८०० लीटर रसायन व गावठी हात भट्टीच्‍या दारूसह एकूण ६२ हजार ४०० रु.किमतीचा माल मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे अवमानता केली म्हणून भादंवि कलम २७०,१८८अन्वये असे २ गुन्हे दाखल करण्यात आ़ले आहे.
तसेच रमज़ान छट्टू गवळी,बुरहान भिकारी गवळी दोन्ही रा. कन्हाळा हे विना कारण संचारबंदी दरम्यान घरा बाहेर फिरतांना मिळुन आल्याने त्यांचे विरूध्‍द १८८प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनी अमोल पवार,एएसआय.सुनिल चौधरीे, पोहेकॉ.विठ्ठल फुसे,पोहेकॉ युनूस ईब्राहिम शेख प्रवीण पाटील, पोकाॅ.प्रदीप ईगळे,होमगार्ड भूषण पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *