कंपनी कामगारांची माहिती द्या -नगरसेवक जगदीश गवते 

नवी मुंबई :
नवी मुंबई महापालिका परिसरात औधोगीक वसाहत असल्याने आपल्या शेजारी कोणी कंपनी कामगार रहात असतील त्यांची माहिती लवकरत लवकर महापालिकेस देण्यात यावी असे आवाहन दिघा प्रभाग 5 चे नगरसेवक जगदीश गवते यांनी केले आहे 
दिघा परिसरातील सॅडोंज कंपनीमध्ये 4 कामगार कोरोनाचे पॉझिटिव्ह सापडले होते तपासणी नंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तरी दक्षता म्हणून आपल्या विभागांमध्ये जर कंपनीमधील कामगार  रहात असल्यास त्यांच्यापासून सर्वांनी दूर राहावे व त्यांची माहिती महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये द्यावी.तसेच सर्व कर्मचाऱ्यांची कंपनीतर्फे कोरोना तपासणी  झाली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तरीसुद्धा आपण त्यांच्या पासून सुरक्षितता बाळगावी त्यांना होम कोरंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्वांनी सुरक्षितता बाळगायची गरज असून आता वायरस आपल्या एकदम जवळ आला आहे. आपण काळजी घेतल्यास सगळे जण सुरक्षित राहू घराच्या बाहेर  गप्पा मारण्यासाठी लोक जमा होत आहे त्यांनी बंद करावे घराबाहेर थांबू नये गर्दी करु नये असे आवाहन नगरसेवक जगदीश गवते यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *