चेकपोस्टवरून बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीने प्रवास केल्यास पोलिसांवर होणार कारवाई ; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा सूचक इशारा :

जळगाव –
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून बंदोबस्तावरील पोलिसांना चकवा देऊन किंवा ज्या मार्गाने बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करेल, तेथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिला आहे.
कोरोनाबाधीत नागरीक जिल्ह्यात येऊ नये, यासाठी नाशिक, बुलडाणा, धुळे व औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर जिल्ह्यात ३१ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून तेथे २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय बर्‍हाणपूरकडून येणार्‍या मार्गावरदेखील चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन असल्याने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *