नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाशी झुंजत असताना त्यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी व डॉक्टर आणि स्टाफ यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या समन्वयातून रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बी साईड यांच्या वतीने अॅड महाजनी व राजेश वर्मा यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच असणारे असे ७०० पी.पी.ई. किट्स तसेच रोटरी क्लब ऑफ मिलेनियम सिटी यांच्या वतीने अध्यक्ष श्रीम निव्या युसुफ व सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत 100 पीपीई किट्स नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास डाॅ. रत्नेश म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.



