परशुराम जयंती घरी साजरी करा-जयंती उत्सव समितीचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे यंदा २५ एप्रिल रोजी होणारी भगवान श्री परशुराम जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन जयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी सर्व भाषिक ब्राह्मण समाजातर्फे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदा ही शोभायात्रा रद्द करण्यात आली असल्याचेही परशुराम जयंती उत्सव समितीने कळविले आहे .सर्व समाज बांधवानी जयंती आपापल्या घरी साजरी करुन या महामारीच्या परिस्थितीत सहकार्य करावे .तसेच जयंती निमित्त समितीतर्फे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येवून या दिवशी गरजुंना अन्नदान व मास्कचे वाटप करण्यात येणार आहे . असे भगवान श्री परशुराम जयंती उत्सव समिति भुसावळ व समस्त ब्राह्मण समाज बांधव यांनी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *