खाजगी दवाखाण्यासोबत दातांचे दवाखाने सुरू करावे – युवासेनेची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्सच बाहेर काढू शकतात यासाठी वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर नागरिकांची भिती दूर होईल. मात्र भुसावळ शहरात शासकीय दवाखाने वगळता काही खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची आरोग्य विषयक चिंता वाढल्यां आहे. मागील काही दिवसा पासुनच वातावरणात झपाटयाने बदल घडत आहे. यामुळे शहरात नागरिकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरु झाली आहे. विशेष म्हणजे दंतरोगी (दातांचे आजार ) मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नागरिकांनी दवाखाने सुरू होण्याची अपेक्षा केली आहे.
खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद ठेवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी युवासेनेने केली आहे .
खाजगी रुग्णालये व ओपीडी बंदमुळे नागरिक औषधाच्या दुकानात जावून स्वत:च औषधी खरेदी करीत आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यांचेवर ताण येत आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी भुसावळ युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी केली आहे.
दातांचे दवाखाने बंद: दंत समस्या वाढल्याने नागरिक त्रस्त ;
भुसावळ शहरातील दातांचे रुग्णालये सध्या बंद आहेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव तोंडावाटे होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. खबरदारी म्हणून सध्या दातांचे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे परंतु दंत रोग समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत म्हणून दवाखाने सुरू करण्यात यावे याबाबत आयडीएच्या पदाधिकाऱ्यांशी युवासेना शहर प्रमुख सूरज पाटील यांनी चर्चा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *