भुसावळ (प्रतिनिधी )- येथील मामाजी टॉकीज जवळील भारत नगर भागात किरकोळ कारणावरुन भरदिवसा चार जणांनी घरात घुसुन युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना रविवार १२ रोजी दुपारी 1 ते दीङ वाजेचे दरम्यान येथे घडली . या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे . शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी युवकावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरुं असून त्याची प्रकृती स्थिर आहे .
येथील भारत नगर भागातील रहिवासी तथा हातमजूर बाळू शिवराम चौधरी हे घरात मुलांसोबत जेवण करीत असतांना घरासमोरून संशयीत आरोपी मयूर गणेश भालेराव हा घरासमोरून सारखा ये जा करीत होता व गाडीचे हॉर्न वाजवित होता म्हणून राहुल बाळू चौधरी वय २० याने हॉर्न का वाजवित आहे म्हणून मयूर यास जाब विचारला याचा राग आल्याने संशयीत आरोपी मयूर गणेश भालेराव , शंकर गणेश भालेराव व गणेश भालेराव याने राहुल च्या गालावर चाकू मारला , तर विक्की कुट्टे (पूर्ण नाव माहित नाही ) याने हातातील पत्री घमेलीने राहुल यास मारहाण करीत धमकी दिली .यावेळी राहुलचे आई वडील मध्ये आले व त्यांनी राहुलला वाचविले असता तेवढ्यात ते मारेकरी पळून गेले . राहुलच्या पोटावर, मानेवर, व गालावर चाकुचे वार लागल्याने राहुल यास त्वरीत गोदावरी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे . याबाबत शहर पोलिसातयाबाबत बाळू शामराव चौधरी यानी फिर्याद दिल्यावरुन संशयीत चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे .



