भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ तालुक्यातील मूसालतांडा व भिलमळी हे आदिवासी वस्ती असलेले तांडे दत्तक घेतले आहे .दरवर्षी शालेय साहित्य,दिवाळी फराळ , ग्रामस्थांसाठी विविध आरोग्य शिबिर,सोईसुविधा ई .सेवा पुरवीत असते .जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने ग्रासले आहे,उद्योग,मजुरी ठप्प आहे. तेव्हा या गावातील सर्व आदिवासी बांधव ज्यांची फक्त मजुरीवर गुजराण होते. त्यांची मदत करणे आपले कर्तव्य समजून क्लबच्या सदस्यांनी या गावांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांची गरज समजून घेतली.घरांची संख्या निश्चीत करुन त्या नुसार नियोजन करून गहू आणि तांदूळ हे राशन मध्ये मिळाल्याने तूरडाळ,तेल,साखर,तिखट , मीठ,गरम मसाला,बेसन,कांदे , बटाटे,साबण कपड्यांचा आणि आंघोळीचा,टूथपेस्ट आदी सामान साधारण एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतके देण्याचे ठरवले .यात सर्व रोटेरीयन सदस्यांनी आर्थिक हातभार लावला.ज्येष्ठ सदस्य आ.संजय सावकारे यांनी भरीव मदत दिली.तर डाॅ.मकरंद चांदवडकर यांनी सर्व टूथपेस्टचा भार उचलला.आज दि.१० एप्रिल रोजी तहसीलदार यांची रितसर परवानगी काढून १० सदस्यांनी कोरोना बाबत सर्व आवश्यक खबरदारी घेऊन या शिधा सामग्रीचे वाटप पूर्ण केले .या साठी मूसालतांडा जि.प.शाळेचे शिक्षक दीपक सुरवाडे यांचे सहकार्य लाभले .या प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सोनू (महेंद्र)मांडे,अध्यक्ष अनिकेत पाटील,सचिव मनोज सोनार व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



