दीपनगरला विधानसभा अध्यक्षांसह मंत्र्यांची धावती भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण देशभरात कोरोना वायरस रोखण्याकरीता लाँकडाऊन सुरू असताना नागपुर येथून बायरोडने प्रवास करून मुंबईला जाणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास मंत्री यांनी अचानक दीपनगर प्रकल्पातील पूर्णा विश्रामगृह येथे गुरूवार 9 एप्रिल रोजी रात्री दरम्यान भेट दिली.
या ठिकाणी त्यांनी जेवण केले व साधारण तासाभराने मुंबई कडे रवाना झाले. राज्यात लाँकडाऊन असताना काँग्रेस च्या वरिष्ठ मंत्र्यांनी अचानक भेट दिल्यामुळे प्रकल्प प्रशासनासह अधिकार्यांची चांगलीच धावपळ उडाली.
यावेळी आ. संजय सावकारे, दीपनगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, ६६०प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *