भुसावळ (प्रतिनिधी)-
सध्या देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला आहे यामुळे अनेक कुटुंबांना हाताला काम नसल्याने चरितार्थ चालवणे कठीण झाले आहे परंतु 90 शाळांमधील बारा हजार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिल्लक असलेला शालेय पोषण आहार समप्रमाणात वाटल्याने बारा हजार कुटुंबाला अन्नधान्याचा आधार मिळाला आहे
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना शासकीय शाळांमध्ये सुरू आहे 22 एप्रिल पासून शाळा बंद झाल्याने व लॉक डाऊन ची परिस्थिती बघता शिक्षण संचालक व जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत शिल्लक असलेला साठा विद्यार्थ्यांच्या समप्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले होते. यानुसार भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण व केंद्रप्रमुख यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक गुरुवारी घेऊन नियोजन केले या काळामध्ये जाण्या-येण्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी पास वाटप करण्यात आल्या लॉकडाऊन च्या काळातही मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून योग्य नियोजनाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक अशा 90 शाळांमधील बारा हजार विद्यार्थ्यांना 500 क्विंटल तांदूळ व 108 क्विंटल डाळीचे वाटप करण्यात आले हे नियोजन अडचणीचे होते परंतु मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कार्यकुशलतेने तालुक्यात कोणत्याही प्रकारची विपरीत घटना अथवा गर्दी न होऊ देता शासनाच्या या नियमाचे काटेकोर पालन करत वाटप केल्याने पाच दिवसात या 12000 कुटुंबाला आधार मिळाला आहे .सध्या हाताला काम नसल्याने गरीब ब् व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांचे त्यांचे पोषण व्हावे तसेच च् कुटुंबाला देखील आधार मिळावा या उद्देशाने या या साहित्याचे वाटप करण्यात आले
शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने 100% वाटप : –
शाळा बंद असताना व गर्दी होऊ न देता शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप करणे हे काम जिकरीचे होते परंतु शिक्षक व मुख्याध्यापकांच्या योग्य नियोजनामुळे तालुक्यातील 100% शाळातील पोषण आहाराचे साहित्य वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला या माध्यमातून आधार मिळाला आहे.
तुषार प्रधान- गटशिक्षणाधिकारी,भुसावळ



