जळगाव जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत शासनाकडे मागणी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पत्रकार परीषदेत माहिती

जळगाव –
जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीत केली असून याबाबत प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ना पाटिल यांनी माहिती दीली , राज्याच्या कॅबिनेटची बैठक मंगळवारी व्हिसीव्दारे पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमधून पालकमंत्री पाटील यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, आमदार फंडातून 50 लाख रुपये कोरोनासाठी देता येणार आहेत. केशरी कार्डधारकांना धान्य देण्याबाबत शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संचारबंदीच्या काळात होमगार्डसची नियुक्ती करण्याचीही मागणी केली असून तालुका तेथे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात यावीत, कामगारांची उपासमार होणार नाही. कामगार कल्याण मंडळाने मदत करावी, अशा सूचना शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकर्‍यांची केळी खरेदी करण्याबाबत जैन इरीगेशन सिस्टिम्सला विनंती करणार असल्याचे सांगून त्यांनी टँकर सुरू करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यां ऐवजी तहसीलदारांना देण्यात यावेत, अशीही मागणी शासनाकडे केल्याचे यावेळी ना . पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *