भुसावळ (प्रतिनिधी )-
-सर्व जनता कोरोना व्हायरस मुळे त्रस्त झाली असतांना आणि प्रशासन सर्व बाजूनी प्रयत्नांची शिकस्त करत असतांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन मदत करण्याचे नियोजन केले आहे .प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन भुसावळ शहरातील विविध हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांची जेवणाची अत्यंत गैरसोय होत असल्याने त्यांना मोफत जेवण पोहचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .दररोज एकावेळचे ५० असे १०० डबे देण्यात येत आहे.या बाबत माहिती एसएमएस द्वारे कळवली जाते .या उपक्रमात मागणी येणाऱ्या पेशंट व नातेवाईक यांना 14 एप्रिल पर्यंत सकाळ, संध्याकाळ असे जेवणाचे पार्सल पोहचवण्यात येतील .सर्व प्रकारची आरोग्याबाबत काळजी शुद्ध जेवण पोहचवताना घेण्यात येत आहे .प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिकेत पाटील,सचिव मनोज सोनार व सर्व रोटेरीयन सदस्य प्रयत्न करीत आहे .समाजाच्या सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



