भुसावळ पालिकेच्यावतीने भुसावळातील प्रभाग क्रमांक ९ व १९ मध्ये जंतुनाशक फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता शहरातील जवळपास अनेक प्रभागातील नगरसेवकांनी आपले आद्य कर्तव्य व नागरिकांची सुरक्षेचे हित लक्षात घेवून पदरमोड करीत स्वखर्चाने आपआपल्या प्रभागात जंतुनाशक फवारणी करीत आहे . शहरात काही भागात पालीकेच्या माध्यमातून मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर येथील प्रभाग क्रमांक ९ व १९ मध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी , नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, यांचेसह भुसावळ नगरपरिषदचे अधिकारी प्रदीप पवार, वसंत राठोड, तसेच कर्मचारी चंद्रकांत पाटिल ,धर्मेंद्र खरारे यांचेसह सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *