भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सीवायएम कार्यालयातील गुड्स लॉबी मध्ये आज दि.१ एप्रिल रोजी एनआरएमयु रनिंग शाखेतर्फे कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी गार्ड,लोको पायलट, सह.लोकोपायलट यांच्यासह परिचालन स्टाफच्या सर्व कर्मचा-यांना सॅनिटायजर,मॉस्क, डेटॉल साबण,हैंडग्लोज, टिशु पेपर वाटप करण्यात आले.
यावेळी विभागीय सचिव आर.आर.निकम,शाखाध्यक्षआर.पी.भालेराव,सचिव ए.टी.खंबायत,कोषाध्यक्ष एस बी तळेकर,उपाध्यक्ष डी.बी.महाजन,प्रदीप गायकवाड,एस एस वानखेड़े,सह सचिव संजीव श्रीनाथ,अनिल मालविया,मोहम्मद असलम,सरबजीत सिंग,हेमंत करोसिया,ए.व्ही.अडकमोल,डी. आर.स्याम,सय्यद सादिक़,डी.जी.मोरे,प्रशांत सैतवाल,योगेश व्येवहारे,के.पी.हिरे, एम.पी.चौधरी,योगेश विनते आदी उपस्थित होते.



