भुसावळ विभागातील गार्ड यांची कौतुकास्पद कामगिरी ; ओएचई मधील तांत्रिक बिघाड त्वरित वरीष्ठांना कळविल्याने अनर्थ टळला ; वरिष्ठ मंडळ परिवहन प्रबंधकांनी केले कार्याचे कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातील बडनेरा येथिल गार्ड यांच्या सतर्कतेमुळे व कामाप्रती असलेली एकनिष्ठा व कर्तव्यदक्षपणा यामुळे ओएचई मधील तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ओएचई ब्रेकअप वाचला व पुढील अनर्थ टळला.
बिलासपूर विभागात ३०मार्च रोजी सुमारे ७ वाजता कोटमा – भटेल या स्थानकावर 902/8 कि.मी. येथे ओएचई वायर कट झाली होती.त्याचवेळी 902/08 येथून डाऊन गाडी जात असताना भुसावळ विभागातील कर्मचारी ट्रेन गार्ड मो. उमर रझा इलेक्ट्रिक लोकोतून तेथून जात होते . कोटमा -भटेल यांच्यात 902/8 कि.मी इलेक्ट्रिक लोको पास होत असताना ओएचई वायर मध्ये स्पार्किंग होत असतांना त्यांना दीसले . नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी ते त्वरित साइटवर आले. यावेळी त्यांना ओएचई वायरचा कट आणि लटकलेल्या काही वायरी दिसल्या. त्यांनी त्वरीत या तुटलेल्या वायरची छायाचित्रे घेतली व क्षणाचाही विलंब न करता हेल्पलाईन क्र. 182 आणि नंतर ऑन ड्यूटी उपप्रबंधक कड़े जाऊंन याघटनेबाबत सूचना दिली.
यावरुन ऑनड्यूटी असलेले उपस्टेशन प्रबंधक यांनी त्वरित याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यावरून त्वरित ओएचई केल्याने कर्मचाऱ्यांनी रात्रिच दुरुस्ती केली . रेल्वे कर्मचारी गार्ड सतर्कतेमुळे आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे ओएचई ब्रेकअप वाचला. या उल्लेखनीय कामाबद्दल वरिष्ठ मंडळ परिवहन प्रबंधक यांनी मो. उमर रझा यांचे कोतुक केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *