साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना संदर्भात दक्षता समिती स्थापन; जनजागृतीसाठी उत्कृष्ट नियोजन ; बाहेर गावातील नागरिकांना गावात येण्यास बंदी;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाव्हायरस आता तिसऱ्या टप्प्यात असून तो घातक स्वरूपाचा ठरू शकतो यासाठी तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत तर्फे कोरोना नियंत्रण संदर्भात दक्षता समिती स्थापन करून सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अशी सर्वसमावेशक समिती गठित करण्यात आलेली असून त्यासंदर्भात सर्वप्रथम संपूर्ण गावात आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर वर छोटी टँक बसवून त्यात सॅनीटाराइंजेशन टाकून संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली तसेच गावात बाहेरगावाहून आलेले 135 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून व वेळोवेळी दररोज त्यांच्याकडे जाऊन आशा वर्कर भेट घेतील असे निश्चित झाले आरोग्य सेविका आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस आदी सर्व टीम दररोज दोन तास संपूर्ण गावात पाहणी करून कोणी संशयित दिसल्यास की आढळल्यास ग्रामपंचायत च्या लक्षात आणून देईल व आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर तपासणी व पुढील कारवाई संदर्भात ग्रामपंचायत निर्णय घेईल यावेळी प्रामुख्याने ग्रामस्थांनी कुठेही ही चौकात अथवा कट्ट्यावर अथवा घराबाहेरील ओट्यावर, मंदिरांवर, व परिसरात बसू नये अशा सक्त सूचना ग्रामपंचायत मार्फत देण्यात येत आहेत. ग्रामपंचायत मार्फत सर्वत्र स्वच्छता साफसफाई तसेच घंटागाडीच्या माध्यमातून सर्व कचरा गावाबाहेर टाकला जात आहे तसेच घंटागाडी वर स्पीकर बसवून नागरिकांना कोरोनाव्हायरस नियंत्रण व खबरदारी घेण्या संदर्भात विविध सूचना वेळोवेळी देण्यात येत आहे ग्रामपंचायत सर्व कर्मचारी सरपंच कमिटी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर सर्व अथक परिश्रम घेत आहेत तरी गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घराच्या बाहेर पडू नये स्वतःची व परिवाराची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना करण्यात आलेली आहे गावात ट्रॅक्टर फवारणी प्रसंगी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच आनंद ठाकरे ,ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, दिगंबर पाटील, गजानन कोळी ,पोलीस पाटील राजू सपकाळे, बळीराम सोनवणे, ग्राम विकास अधिकारी गौतम वाढे,यांचेसह भवानी नगरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *