वरणगाव येथे 1 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहना नुसार आपल्या राज्यामध्ये फक्त ८ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे व भविष्यात रक्ताची कमतरता पडू नये म्हणुन रक्तदान शिबीर आयोजीत करावे या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन वरणगांव नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक राजेंन्द्र विश्वनाथ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन राजेंद्र विश्वनाथ चौधरी मित्रपरिवार वरणगाव शहर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
येत्या १ एप्रिल रोजी राजेंन्द्र विश्वनाथ चौधरी यांच्या वाढदिवसाला कुठलेही हार गुच्छे व भेटवस्तु न आणता भविष्यात उद्भभवणाऱ्या आपत्तीसाठी व गरजु रुग्णांसाठी रक्तदान करावे असे आयोजकांनी कळविले आहे .
१ एप्रिल २०२० बुधवार रोजी सकाळी १०ते दुपारी ३पर्यंत डॉ.राहुल भोईटे यांचे हॉस्पिटल,वरणगाव येथे रक्तदान घेण्यात येईल . याकरीता नाव नोंदणी आवश्यक असून
उद्या दि.३१ मार्च रोजी सकाळी.१० ते संध्या ७ पर्यंत डॉ.राहुल भोईटे यांचे हॉस्पिटल वरणगाव येथे अथवा (फोन द्वारे नोंदणीसाठी संपर्क) किरण गुणवंत माळी 9637638785/पवन प्रदीप मराठे – 7447525757/आकाश दिलीप झोपे – 9370071323/ प्रशांत लक्ष्मण मोरे 8983170122/ सोहेल कुरेशी 9763786281/ यश विजय चौधरी- 9156117627/ सुमित संतोष चौधरी- 8446729146 यांचेकडे नाव नोंदणी करावी असे आयोजक यानी कळविले आहे . नाव नोंदणी वेळी जी वेळ दिली जाईल त्या वेळेवरच रक्तदानासाठी यावे जेणेकरून गर्दी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *