भुसावळ (प्रतिनिधी )-
लॉकडाउन व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भयभीत झालेले बहुतांशी हातमजूर, कष्टकरी, गोर गरीब जमेल तसे मजल दरमजल करीत आपआपल्या गावी निघाले आहेत . अश्या बिकट परिस्थितीत पोटाची खळगी भरायला काहीही व कोणताच मार्ग वा साधन नाही .भुसावळ राष्ट्रीय महामार्गा वरुन दररोज अनेक कुटुंबआपल्या गावी घराकडे मार्गस्थ होत आहे .
या भुकेल्यांना नाष्टा व जेवण देवून मदतीचा हात देण्याकरीता येथील आर्य निवास लॉजिंग बोर्डिंग , प्रेम निवास लॉज, श्री वॉटर प्लांट, यांच्या सहकार्याने राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे १५० ते २०० लोकांना सकाळी नाष्टा बिस्किट्स व भाजी, चपाती जेवण , पिण्याचे पाणी , देण्यात येत आहे .याकरीता हर्षल योगेश जोशी, शिवधर रमाशंकर दुबे, दर्शन रमेश परदेशी, अंकीता सिंग, मणी भूषण पांडे, कृष्णा उदयसिंग काके , परिश्रम घेत आहे .



