भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,जळगांव यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार ,तसेच महाराष्ट्र कायदा 1951 चे कलम 43 चे अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी व कोरोना (केव्हिड 19 ) चा संसर्ग व प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहे. असे भुसावळ नगरपालिका या क्षेत्रासाठी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी कळविले आहे .
नगरपरिषद याची सध्या चालू असलेली दैनिक घाउक/ठोस/लिलाव व किरकोळ बाजाराची ठिकाणे पूर्णतः बंद केलेली आहेत.तसेच भुसावळ नगरपरिषद हद्दीतील भाजीपाला /फळ घाउक व किरकोळ विक्री ,वेळ व त्यांची ठिकाणे यांच्यामध्ये बदल करण्यात आलेला असल्याचे मुख्याधिकारी
भाजीपाला घाउक/ ठोस/लिलाव पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान सकाळी 5.00 वाजेपासून 8.00 वाजेपर्यत करण्यात येईल किरकोळ विक्री पूर्ण बंद राहील.फळे घाउक/ ठोस/लिलाव पद्धतीने नेहरू मैदान जामनेर रोडवर सकाळी 5.00 वाजेपासून 8.00 वाजेपर्यत करण्यात येईल किरकोळ विक्री पूर्ण बंद राहील. भाजीपाला/फळे किरकोळ विक्री सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यत भुसावळ हायस्कुल ग्राउंड,टी.व्ही.टॉवर ग्राउंड,शाळा नंबर 3 खडका रोड, शंभूराजे चौक गडकरी नगर,मातृभूमी चौक,विकास कॉलनी जामनेर रोड आशा ठिकाणी करण्यात येणार आहे.आडते/ ठोस विक्रेते/शेतकरी/किरकोळ विक्रेते यांनी कारेखोरपणे पालन करावे. मा. जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जे सर्व पदार्थ आडते/ ठोस विक्रेते/शेतकरी/किरकोळ विक्रेते चुकीच्या जागी विक्री करतांना आढळल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे पत्र भुसावळ नगरपरिषद भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी काढले आहे.



