भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करते आहे तसेच आपली स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुसावळ येथील नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी स्वतः पदरमोड करत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या परिसरात रसायनिक औषधे फवारणी केली आहे.
दारं खिडक्या गेट अशा ठिकाणी नागरिक वारंवार स्पर्श करतात त्यामुळे प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा ठिकाणी स्वतः नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी औषधांची फवारणी केली आहे. राजकारणा पेक्षाही जनतेचे आरोग्य हे अधिक महत्त्वाची असल्याने संपूर्ण देश आज कोरोना च्या संकटात आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शासनाने दिलेल्या आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून करावे व कोरोना पळून लावण्यासाठी हातभार लावावा असे ही यावेळी नगरसेवक पिंटू ठाकूर म्हणाले.



