भुसावळात वैश्विक महामारीच्या प्रतिबंधासाठी “जनता कर्फ्यू ” दरम्यान हनुमान चालीसा पठन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि . 22 मार्च रोजी कोरोना या वैश्विक महामारी च्या प्रतिबंधा साठी “जनता कर्फ्यू” चे आवाहन केले होते, या विषयाला अनुसरुन भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वार्ड येथील श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे आज,22 मार्च रोजी आपापल्या घरी सर्व एकत्रित कुटुंब मिळून 11 वेळा हनुमान चालीसा पाठासाठी आवाहन केले होते , दिवस भरात ४९ परिवारांनी आता पर्यन्त यात सहभाग घेऊन घरातच राहुंन हनुमान चालीसा पाठ करुन जनता कर्फ्यू मध्ये सहभाग घेतला.
पुढील महिन्यात येणाऱ्या हनुमान जयंतीला सर्वांकरीता व या परिवारासाठी होम करून त्यांच्या निरोगी आरोग्या करीता हनुमंताला प्रार्थना करण्यात येईल असे श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदास वैष्णव यांनी कळविले आहे,
आजच्या आयोजना साठी किरण पाठे, आशीष तिवारी, नमा शर्मा , जय प्रकाश शुक्ला, अँड मेघा वैष्णव, भारती वैष्णव ,प्रसाद पांडे यांनी परिश्रम घेतले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *