भुसावळात गो कोरोना चा नाद; ठिकठिकाणी नागरिकांनी व्यक्त केले आभार

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाला परास्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनला जनता कर्फ्यु दरम्यान 5 वाजेला थाली वाजवत ,शंख नाद , घंटी व टाळया वाजवून अबालवृद्ध यांचेसह नागरिकांनी कोरोनाच्या भयानक स्थिती मध्ये सुद्धा अविरत कार्य करणाऱ्या समाजरक्षकांचे , डॉक्टर्स,नर्स, पोलीस,विज कर्मचारी , यासह अत्यावश्यक सेवेशी निगडित सर्वासाठी घराबाहेर येवून टाळया वाजवून प्रतिसाद दिला तर युवकांनी ढोल वाजवून आभार मानले .
प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबासह घराबाहेर येवून या सर्व समाज रक्षकांचे आभार थाळी वाजवत व टाळया वाजवून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *