भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे तर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि कोरोना मुळे होणारा दुष्प्रभाव टाळण्यासाठी अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट खरेदी करण्यासाठी तीकीट खिड़की वर न जाता आपले तिकीट युटीएस अँप्सद्वारे काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे .
यामुळे त्यांचा वेळ आणि आरोग्य चांगले राहिल कोरोना च्या पार्श्वभूमीवर तिकीट काढण्याकरीता कागदाचे तिकीट व नोटांना स्पर्श करावा लागतो तसेच गर्दी मध्ये उभे राहून तिकीट काढावे लागते म्हनून प्रवाश्यानी आपल्या स्मार्ट फोनने युटीएसअँप्सद्वारे डिजिटल तिकीट मिळवा. युटीएसअँप्सद्वारे तिकीट काढले की आपल्याला ५ टक्के बोनस मिळणार आहे . यूटीएस मोबाईल अॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिम सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे. प्रवाशांना यूटीएस अॅपची वैशिष्ट्ये, ते डाऊनलोड करण्याची प्रक्रिया आणि ते कसे वापरावे याबद्दल माहितीस्तव शिक्षित करण्यासाठी विविध स्थानकांवर अनेक ड्राइव्ह चालवले गेले आहेत. या व्यतिरिक्त तिकिट रोलवर, अॅनिमेटेड व्हिडिओ आणि रेडिओ जिंगल्सवर देखील यूटीएस अॅपची जाहिरात केली जात आहे. ५ टक्के बोनस आणि यूटीएस अॅपद्वारे सीजन तिकिटांची सहजतेने होणारी बुकिंग याची नागरिकांच्यावतीने प्रशंसा केली जात आहे.



