भुसावळ रेल कामगार सेनेचा स्तुत्य उपक्रम ; मावळ्यांसह नागरिकांची भागवली तृष्णा ; शिवजयंतीला केले पाणी वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल कामगार सेनेतर्फे शिवजयंतीला पाणी वाटप करून सहभागी भुसावळकरांची
तृष्णा भागवून स्तुत्य उपक्रम राबवला. याबद्दल नागरिकांनी कौतुक केले आहेत .
भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकतीच तीथीनुसार जयंती साजरी करण्यात आली .जयंती निमित्त शहरात प्रतिवर्षी छत्रपतींची सवाद्य मिरवणुक काढण्यात येते.यावेळी मिरवणुक बघण्याकरीता व महाराजांना मुजरा करून वंदन करण्यास आलेली मंडळे ,सहभागी पदाधिकारी व कार्यकर्ते ,मावळे यांच्यासह नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याकरीता भुसावळ रेल कामगार सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळया जवळ पाणपोई लावण्यात येवून पाणी वाटप करण्यात आले .
यावेळी रेल कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष लललितकुमार मुथा , प्रदीप भुसारे , वीरकुमार ममैय्या , कृष्ना महाजन , पंकज ठाकरे , सुरेंद्र यादव , मोहन राजपूत, प्रीतम टाक , कमलाकर बनाइत , सूरज सागर , अब्दुल अजीज , योगेश माळी , आर के बोकाडे , मंगेश बोरोले , प्रकाश करसाले, मंगेश शेलोडे, शांताराम सपकाळे यांचेसह संघटनेचे पादाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *