भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभुमीवर भुसावळ शहरातील रविवारचा आठवडे बाजार 31 मार्च पर्यंत रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी बुधवार १८ रोजी काढले आहेत.
शहरात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यक्रमात धर्मगुरु किंवा पुजारी आदींनी विधीवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही तसेच खासगी कार्यक्रम केवळ कौटूंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही परंतू या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकिय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहणार असल्याचेही कळविले आहे .



