मुक्ताईनगर दि.18
अवकाळी पाऊस व गारपिठीने नुकसानग्रस्त शेती पिकांची आ.चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याच्या तहसीलदार व कृषी अधिकारी यांना आ. पाटील यांनी सुचना दिल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत दूरध्वनी वर चर्चा केली .
सविस्तर वृत्त असे की दि. १७ रोजी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर या तिन्ही तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तहसीलदार यांना याबाबत निवेदन देवून नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सुचना केल्या.तसेच आ.दि. 18 रोजी मुक्ताईनगर तहसीलदार श्याम वाडकर व तालुका कृषी अधिकारी श्री. व्यवहारे यांना सोबत घेऊन खामखेडा, उचंदा, काकोडा, बोरखेडा, राजुरा, पारंबी, उंबरे व तालखेडा येथे नुकसानग्रस्त शेतींची पाहणी केली. पहाणी दरम्यान तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना आ.पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना केल्या. आमदारांच्या सुचनेनुसार ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी विभागाच्या अधिकार्यांना तहसीलदार श्री.वाडकर व कृषी अधिकारी श्री .व्यवहारे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी परिसरातील शेतकरी नवनित पाटिल, रामधन पाटिल, डिगंबर बोदडे, गजानन पाटिल, रवि पाटिल, उल्हास पाटिल, राजेश पाटील, पुंडलिक भाऊ , सोपान पाटिल, सुरेश कोळी, शिवाजी पवार, सुनिल धांडे, रामकृष्ण ढेंगे, सुनिल बोंबटकार,एकनाथ खंडागळे, राहुल गोंगे, तसेच यू. डि. पाटिल सर, गोपाळ सोनवणे, बन्ना पाटिल, तेजराव पाटिल, पंकज पांडव, सतिष नागरे, रूषिकेश पाटील, दिपक वाघ पाटिल, अविनाश वाळे, निलेश पाटिल, विशाल बोदळे स्विय्य सहाय्यक संतोष कोळी यांची उपस्थिती होते.
यावेळी गहू, हरभरा ,मका,डाळींबी, केळी अश्या विविध नुकसानग्रस्त पिंकांची पहाणी करण्यात आली.
मुक्ताईनगर तालुक्यातील 81 गावांपैकी 70 गावांना नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तसेच 490 शेतकर्यांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले असल्याचे तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी सांगितले. यामध्ये गहू-490 हेक्टर, हरभरा 254 हेक्टर, मका 239 हेक्टर, कांदा 5 हेक्टर ,भाजीपाला 5 हेक्टर, केळी 68 हेक्टर एकुण 1061 हेक्टर सर्वसाधारण नुकसान असल्याचे प्राथमिक माहिती यावेळी तहसीलदार श्याम वाडकर व तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
तसेच तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी तलाठी, ग्रामसेवक, व कृषी सहाय्यक यांना 19 ते 21 पर्यंत पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या लेखी सुचना यावेळी केल्या.
शेतकरी बांधवांनी पंचनामे करून घ्यावे – आ . पाटिल
सर्व शेतकरी बांधवांनी कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करुन घ्यावेत असे आवाहन आ.चंद्रकांत पाटील यांनी केले.


