भुसावळात पुन्हा धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न ; शिक्षिकेच्या सतर्कतेने चोराच्या हाती लागले पदक

भुसावळ (प्रतिनिधी )-
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने
गेटबाहेर दुचाकी लावत असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातून चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने सतर्कता दाखवत मंगळसूत्र हातात धरून ठेवल्याने केवळ पदक लांबवत चोरटे पसार झाले. शहरातील पवन नगर, प्रभात कॉलनी परीसरात बुधवार १८ रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात वारंवार धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीचे प्रकार घडत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील के.नारखेडे विद्यालयातील महिला शिक्षिका
घरी परतल्यानंतर घराबाहेर दुचाकी लावत असताना दुचाकीवर आलेल्या 30 ते 35 वयोगटातील दोघांनी पत्ता विचारला व त्यांचे लक्ष विचलीत करून मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र शिक्षिकेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे केवळ पदकच चोरट्यांच्या हाती लागले. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अद्याप महिलेने शहर पोलिसात तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *