शिवचरण उज्जैनकर यांची दहाव्या शुभम बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ; सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ;

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)-
येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण यांची नुकतीच गोवा येथे 30 मे रोजी होणाऱ्या दहाव्या शुभम बाल-किशोर, युवा व नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातून ,गोव्यातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या निवासस्थानी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन ,अंकुर साहित्य संघ तालुका मुक्ताईनगर, केंद्रीय मानवाधिकार संघटनांचे प्रतिनिधी मित्र परिवार पत्रकार विनायक वाडेकर, साहित्यिक प्रमोद पिवटे ,पत्रकार शरद बोदडे ,पत्रकार चंद्रमणी इंगळे ,डॉ सुनील उदे, वेंडर सुनील सोनार, नरेश पोतदार, प्रा बी जी माळी , शामकांत रुले ,योगेश बुडुखले , विनोद शुरपाटणे, आदींनी उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सत्कार केला बोदवड येथील सुभाष शुरपाटणे यांनी प्रसंगी उज्जैनकर सर यांना पेढा भरून शुभेच्छा दिल्या
यावेळी शामकांत रुले यांनी प्रास्ताविक सादर करून ठराव पारित केला त्याला महेंद्र तायडे यांनी अनुमोदन दिले उज्जैनकर सर यांनी सर्व मित्र परिवाराचे हार्दिक आभार मानले ते पुढे म्हणाले की, दहाव्या शुभम बाल-किशोर युवा व नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे या मराठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा आतीश सोसे अकोला व कोल्हापूर चे साहित्यिक मित्र डॉ श्रीकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी व तसेच गोवा येथे आयोजित या संमेलनाचे आयोजक कृष्णा महालचेकर व गोवा येथील सर्व साहित्यिक मित्रपरिवार यांच्या प्रयत्नाने हा मान आपल्याला मिळाला प्रसंगी उज्जैनकर यांनी त्यांचे आभार मानले हा मान आपल्या साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांचा आहे शैक्षणिक ,सामाजिक, साहित्यिक ,कला ह्या विविध क्षेत्रात आपण केलेल्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल ही फार मोठी उपलब्धी असल्याचेही प्रसंगी ते म्हणाले . महाराष्ट्रातील जवळपास शंभर साहित्यिक मित्र या संमेलनाला उपस्थित राहतील असेही उज्जैनकर यांनी सांगितले . त्याबद्दल उज्जेनकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *