भुसावळ (प्रतिनिधी )-
शहराजवळ वाघुर नदीच्या पायथ्याशी महामार्गावर असलेल्या कब्रस्तानची युवा वर्गाने श्रमदानातून साफसफाई करून तब्बल २० टन कचऱ्याचे विल्हेवाट लावली.
एकाच ठिकाणी असलेल्या ईदगाव व कब्रस्तान येथे कबर (समाधीवर )मोठे काटेरी झुडपांची वाढ झाली होती, तसेच अनेक समाधीची दुर्दशा झाली होती , पूर्वज कब्रस्तान मध्ये चिरनिद्रिस्त झालेले आहे, त्यांच्या कबरची दुर्दशा होऊ नये असे संकल्प युवावर्गाने केले व रविवारी सकाळी ९ वाजेपासून श्रमदान करण्याचे ठरविले, ठरल्याप्रमाणे तब्बल ७० युवकांनी कब्रस्तान व इदगाह मध्ये स्वयंस्फूर्तीने काटेरी झुडपं, ओबड-धोबड माटी ठिकाणी तुटलेल्या तार कंपाउंड (संरक्षण भिंत) तुटलेल्या जागेवरून वर नको ते प्राणी टाळण्यासाठी संरक्षण भिंत तयार केली व या जागी तब्बल २० टन पेक्षा जास्त कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली. प्रत्येक रविवारी श्रमदानातून सामाजिक कार्य करण्याचे युवावर्गाने ठरवले असून यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी, त्यांना मार्गदर्शन लाभत असून युवावर्ग स्वयंस्फूर्तीने पुढे आल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रसंगी युवा वर्गाचा उत्साह वाढवण्यासाठी कर्तव्यदक्ष तत्पर अधिकारी ग्रामसेवक गौतम वाडे यांनी कब्रस्तान येथे येऊन युवकांना प्रोत्साहित केले .



