भुसावळ (प्रतिनिधी )-
श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती येथील डीआरएम कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी भुसावळ मंडळ येथे श्री छत्रपति शिवाजी महाराज , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा , वरिष्ट मंडल अभियंता व ( समन्वय ) राजेश चिखले , वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी मनोज गांगुर्डे यांनी पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला . . याप्रसंगी वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा , सर्व शाखाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . तसेच रेल कामगार सेनेचे ललित मुथा यांचेसह सर्व अधिकारी उपस्थित होते .



