तीन गाड्यांच्या थांब्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा

भुसावळ (प्रतिनिधी )- तीन रेल्वे गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी शेगाव, धामणगाव व मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा वाढवून देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 17623/17624 अप डाऊन नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस या गाडीला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे तर गाडी क्रमांक 12113/12114 अप-डाउन नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस या गाडीला धामणगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. गाडी क्रमांक 22109/22110 अप-डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *