भुसावळात शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी : लाडक्या राजाला मानाचा मुजरा जय भवानी ,जय शिवाजी , च्या जयघोषाने परिसर दुमदुमला ; शहरातील 13 मंडळांचा मिरवणुकीत सहभाग ; उत्सव समितीने केला सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरासह परिसरात तिथी व परंपरेनुसार गुरूवार रोजी शिवजयंती उत्सव समिती व भुसावळकरांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , जय भवानी जय शिवाजी , च्या गगन भेदी जयघोषाने संपूर्ण दिवसभर परिसर दुमदुमला .
सवादय भव्य मिरवणूक
सायंकाळी सवादय, डीजे कि,बँड पथकासह वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली .मिरवणुकीत अश्वारूढ बालशिवाजी व शिवाजी राजे यांची तसेच मावळ्यांची वेशभूषा केलेले युवक सहभागी झाले होते . शिवाजी महाराज यांच्या पुतळया सभोवतालच्या परिसराला तटबंदी व बुरुज उभारण्यात येवून किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला .यामुळे शिवकालीन चित्र सर्वांच्या नजरेसमोर उभे राहिले.सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले.
हा देखावा येथील क्रेझी क्रिएशन राजेश पाटिल यांनी साकारला . सर्वत्र विद्युतरोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली .
. मिरवणुकीत शहरातील विविध भागांमधुन 13 मंडळानी सहभाग घेतला यात 12 मंडळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील व एक शहर पोलिस ठाणे हद्दीमधून निघाली अश्वारूढ बालशिवाजी व शिवाजी राजे यांची वेशभूषा केलेले युवक व मावळे सहभागी झाले होते . तर काही चित्ररथांवर महाराजांचे भव्य पुतळे ठेवण्यात आले होते .
सहभागी मंडळांचा गौरव
यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना उत्सव समितीतर्फे सन्मानचिन्ह ,शाल व श्रीफळ देवून गौरविन्यात आले . प्रसंगी समिती अध्यक्ष सुनील राखूंडे , नगरसेवक युवराज लोणारी , राजेन्द्र आवटे ,पिंटू कोठारी , नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक संतोष बारसे , उमाकांत शर्मा (नमा ), जेष्ठ शिवसैनिक अबरार ठाकरे , पिंटू ठाकुर, बापू महाजन, दीपक धांडे, सागर वाघोदे, सोनी ठाकुर, शिव वंदना गृप , हिंगणे, यांचेसह व्यासपीठावर उपस्थित होते .
संपूर्ण दिवसभर भुसावळकरानी छत्रपतींना वंदन करून मानाचा मुजरा करण्याकरीता स्टेशन परिसरात रांगा लागल्या होत्या . बुंदिचा प्रसाद वाटण्यात आला .
महाअभिषेक पूजा व मानवंदना
दरम्यान सकाळी टिंबर मार्केट येथील छत्रपतीं शिवरायांच्या पुतळयास दुग्धाभिषेक व महाअभिषेक करून विधिवत पूजा अर्चना करण्यात आली.प्रसंगी शिववंदना गृपने महाराजांना मानवंदना दिली.
शिवजयंती समितीतर्फे अन्नदान
दुपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन परिसरात अन्नदान वाटप करण्यात आले . यावेळी शिवजयंती उत्सव सामिती अध्यक्ष सुनील राखूंडे, युवराज लोणारी , बबलू ब-हाटे , राजेन्द्र आवटे, मुकेश गुंजाळ , नमा शर्मा , दीपक धांडे, युवा अंबोले, अनिकेत पाटिल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.
रेलकामगार सेनेतर्फे पाणी वाटप
दरवर्षा प्रमानें यंदाही मिरवणुकीत सहभागी मावळे व शिव प्रेमी नागरिकांकरीता रेल कामगार सेनेतर्फे पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले .यावेळी रेल कामगार सेनेचे भुसावळ विभाग अध्य्क्ष ललित मुथा, प्रदिप भुसारे , यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
उत्सव समितीतर्फे मोफत फोटो
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनास आलेल्या नागरिकांनी काढण्यात आलेले फोटो समितीतर्फे मोफत काढून देवून समितीने राबविलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
शिवसेनेकडून कोरोना बद्दल जनजागृती
सकाळी शिवसेनेकडून कोरोना व्यायरस बाबत मास्क लावून जनजागृती करण्यात आली.
चोख पोलीस बंदोबस्त
शिवजयंती उत्सव व मिरवणुकी दरम्यान शहर व परिसरात डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत ,शहर पो नी बाबासाहेब ठोंबे , पो नि रामकृष्ण कुंभार यांचेसह पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त राखला .याकरीता समिती पदाधिकारी यांनी डीवायएसपी राठोड यांचे स्मृतिचिन्ह देवून विशेष कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *