भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-२० क्रिकेट संघटनेतर्फे मलकापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जळगाव जिल्हा संघाने जळगाव शहराला ८ गडी एक चेंडू शिल्लक ठेवत विजेतेपद पटकाविले ,तृतीय स्थानी अकोला संघाला समाधानी राहावे लागले, १० वर्षाचा शिवांश अग्रवालने अष्टपैलू कामगिरी करत प्लेयर ऑफ द टुर्नामेँट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर ७ ते ९ मार्च २०२० रोजी ९वी १५ वर्षातील राज्य अजिंक्यपद ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा पार पडली, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जळगाव शहर संघाने निर्धारित दहा षटकांमध्ये ७५ धावा फटकाविल्या, प्रत्युत्तरात जळगाव जिल्हा संघाने निर्धारित लक्ष ८ गडी व एक चेंडू राखत पार केले. जळगाव जिल्हा संघाकडून प्रणव फिरके याने चौफेर फटकेबाजी करत २९ धावा काढल्या.
तृतीय स्थानसा़ठी अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात अकोला संघाने बुलढाणा संघाला नमवत चार धावांनी सामना जिंकला. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू कोलकत्ता येणारा होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील,
१० वर्षाचा जळगाव शहर संघाचा खेळाडू शिवांश अग्रवाल यांने विकेट कीपरींग करताना चार झेल व दोन यष्टीचीत करून स्पर्धेमध्ये ५४ धाव्या फटकाविल्या या लहान खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेँट ने सन्मानित करण्यात आले.
विजयी संघाला राज्य ट्वेन्टी क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, बुलढाणा जिल्हा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, स्वप्नील साळुंके, अभिनव यादव, नारायण बटुले, सागर कुमार, मनोज जाधव शरीफ रंगरेज अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत चषक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी प्रतीक कुलकर्णी, राहुल कोळी, तारीख अहमद यांनी परिश्रम घेतले.पंच म्हणून नईम खान, यश निहलानी, अविनाश जगताप यांनी काम बघितले गुणलेखक म्हणून गणेश सहानी, पराग पाश्शा यांनी कार्य केले .
फोटो ओळ ;-
विजयी जळगाव जिल्हा संघाला (लाल ड्रेस) चषक देताना राज्य संघटनेचे सचिव वासेफ पटेल, चंद्रकांत साळुंखे ,राहुल कोळी,प्रतिक कुलकर्णी, मनोज जाधव ,शरीफ रंगरेज, तारीख अहमद आदी



