भुसावळात महिलांनी पर्यावरणाचा संदेश देवून साजरी केली धुळवड ; मनोरंजनासह घेतला खेळाचा आनंद ( सखी श्रावणीचा स्तुत्य उपक्रम )

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी रूढि ,परंपरा आगळयावेगळ्या पद्धतीने पर्यावरण वाचवा असा संदेश देत होळी साजरी केली .
स्थानिक चक्रधर नगर भागात मंगळवार १० रोजी दुपारी ४ वाजता आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ वंदना वाघचौरे या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार उज्वला बागुल , श्रीमती पुष्पा चौधरी(आजी ) ,सैनिक पत्नी सौ. उज्वला चौधरी ,योग शिक्षिका सौ. मंदाकिनी केदारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी महिलांनी दिपप्रज्वलना सारख्या रूढि परंपरा यांना फाटा देत पाण्याची नासाडी न करता लावलेली झाडे जगवा असा संदेश दिला .याकरीता स्थानिक टीव्ही टॉवर मैदानावरिल लावलेल्या झाडांना जगविण्या करीता झाडांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली .यासह धुलीवंदनाचे औचित्य साधुन महिलांनी आपापसातील हेवे-दावे , मतभेद बाजूला सारुन संगीत खुर्ची , लकी ड्रा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला .यावेळी डॉ वंदना वाघचौरे , उज्वला बागुल , समाज कल्याण विभागाच्या श्रीमती शोभा चौधरी, यांनी मार्गदर्शन केले . तर प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती संस्थाध्यक्षा राजश्री नेवे यांनी दिली . सूत्रसंचलन सौ जयश्री वाणी यांनी तर आभार सौ सुनीता चौधरी यांनी मानले .
संगीत खुर्ची मध्ये उषा राणे , तर लकी ड्रा मध्ये धनश्री राणे, राजश्री बादशहा, जयश्री वाणी यांनी बक्षीसे पटकाविली. मान्यवरांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आले . कार्यक्रम यशस्वीतेकरिता सौ माया चौधरी , यांच्यासह स्मिता माहूरकर, वैशाली सरोदे, कल्पना बोंडे,सुनंदा पाटील, अश्विनी जैस्वाल, वंदना झांबरे ,
लिना इंगळे, वसुंधरा महाजन, अर्चना इंगळे, भाग्यश्री नेवे,
तर विशेष सहकार्य उमेश नेवे , पर्यावरण प्रेमी चंद्रशेखर जंगले गोसेवक रोहीत महाले ,प्रणव डोलारे ,राजेश ठाकुर, मयुर सावकारे ,श्याम शर्मा यांनी झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याची व्यवस्था करुन देत विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले .
सखी श्रावणी संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमाचे उपस्थित महिलांसह व जेष्ठ महिला व वृद्ध आजी यांनी विशेष कौतुक केले . धूलिवंदनाला पहिल्यांदा रंग खेळून आनंद मिळाल्याच्या भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या तर अनेक मैत्रीनींना मिळालेल्यां सुखद धक्याने डोळे पानावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *