कराटे स्‍पर्धेत कौसरबी यास तीन पदके

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड भागातील उर्दु शाळा क्र.२२ मधील ११ वर्षीय इयत्ता ६ वी ची विद्‍यार्थीनी कौसर बी शेख अनीस या विद्‍यार्थीनीने पहिला ओपन कराटे मालेगाव,दुसरा छत्रपती चषक कराटे भुसावळ व तिसरा चॅम्‍पियनशीप सुवर्ण व कांस्‍य पदक पटकावून मुलींच्‍या स्‍पर्धेत प्रथम आली.यामुळे तिची निवड आशिया क्षेत्रिय आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशिक्षक म्‍हणुन सादीक बागवान हे काम पाहत आहे.या यशाबद्‍दल तिचे मुख्‍याध्‍यापक मुसा खान,उपशिक्षक नजमुद्‍दीन सर,परवीन बी,जाकीर सर,वहीदा बी,अन्‍सारी सितारा,सैय्‍यद नुरफातेमा,शकील कुरेशी आदींनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *