भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ पोलीस विभागाच्या वतीने 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला . यावेळी येथील बाजारपेठ, शहर व तालुका पोलिस ठाणे येथे पोलिस काका , पोलिस दिदी, भरोसा सेल, बडी कोप कक्ष, शांतता सामिती सदस्य, जेष्ठ नागरिक योजना कक्षाचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड , शहर पोलिस ठाण्याचे पो नि बाबासाहेब ठोबे , पो नी रामकृष्ण कुंभार , यांचेसह अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला दक्षता समिती महिला सदस्यांचा , पोलिस कर्मचारी , होमगार्ड ,वाहतूक पोलीस कर्मचारी महिलांना गुलाबपुष्प देवून त्यांचा सन्मान केला .
प्रसंगी उपविभागिय पोलिस अधीक्षक गजानन राठोड यांनी जगात भीती पसरवीणाऱ्या कोरोना व्हायरस बद्दल कोणती खबरदारी व काळजी घ्यावी याबद्दलही सूचना करून मार्गदर्शन केले . यावेळी डॉ कीर्ती फलटनकर, अँड. वैशालीव चौधरी, पत्रकार उज्वला बागुल ,माजी नगरसेविका शारदा झोपे ,भारती म्हस्के ,शीतल आव्हाड,रेखा गायकवाड़, वैशाली ठाकुर, कल्पना दामले ,
कल्पना कोल्हे, जयश्री हातेकर, राजश्री सुरवाडे, आरती जोहरी , टिना धांडे,सुरेखा ठाकुर , यांचेसह सर्व महिला पोलीस कर्मचारी सपकाळे, तडवी , जोशी, यांचेसह सर्व दक्षता समिती सदस्यां उपस्थित होत्या .
यशस्वितेकरीता बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नंदू सोनवणे , शहरचे पो कॉ बोदडे, यांच्यासह तालुका पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .


