बिसारा लेडीज इक्वलिटी रनमध्ये धावल्या ८०९ महिला

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडिज इक्वालिटी रन मध्ये भुसावळ शहर व परिसरातील ८०९ महिलांनी सहभाग नोंदवला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित या रनमध्ये ८ ते ८० वर्षे वयोगटातील आबालवृद्ध महिलांनी सहभाग नोंदविला.सकाळी ६-३० वाजता सुरूवात झाली.स्वतः रनमध्ये सहभागी झालेल्या रजनी सावकारे, स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडर डॉ.सोनाली महाजन, समन्वयिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील, पुनम भंगाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रनला सुरुवात झाली.अतिशय शिस्तबद्ध नियोजन असलेल्या या रनचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्याच्या दुभाजकावर स्वयंस्फूर्तीने महिला धावपटूंचा उत्साह वाढवणारे स्वयंसेवक व सामान्य नागरिक होते. त्यात राधाकृष्ण प्रभात फेरी ,जय गणेश जेष्ठ नागरिक संघ ,जय झुलेलाल ग्रुप आदी संस्थांचा प्रामुख्याने सहभाग होता. शिवाय ठिकठिकाणी पाणी व एनर्जी पेयची व्यवस्था केली होती.शिवाय वाल्मिक चौकात रणजीत खरारे यांनी धावपटूंवर पुष्पवृष्टीची व्यवस्था केली होती. त्यामुळे महिला धावपटूंच्या चेहऱ्यावर विजयाची भावूक अशी प्रतिक्रिया उमटत होती. स्वयंसेवकांसोबतच सहकारी महिला धावपटू देखील एकमेकांना धावण्यासाठी प्रोत्साहित करीत होत्या .
रन पूर्ण केलेल्या प्रत्येक यशस्वी धावपटूला मेडल प्रदान करण्यात आले.रनच्या आधी पारुल वर्मा यांनी सहकाऱ्यांसोबत झुंबा सेशन घेतले .सूत्रसंचालन जूनेरिया शेख तर आभार प्रदर्शन डॉ.चारुलता पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ.नीलिमा नेहेते यांनी रनच्या मार्गाबद्दल व सद्यस्थितीत कोरोना व्हायरसपासून कसे संरक्षण करावे याचे मार्गदर्शन केले .तसेच ब्रँड ॲम्बेसेडर डॉ.सोनाली महाजन यांनी उपस्थित महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रम शहरातील कोरोनेशन क्लब येथे पार पडला. शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जागतिक धम्म परिषद आयोजित केली असून त्यातही शेकडो नागरिक सहभागी झाले होते .त्यामुळे एका बाजूला धार्मिक वातावरण तर दुसरीकडे महिला शक्तीचा उत्साह व जागर असा दुग्धशर्करा योग यावेळी भुसावळकरांनी अनुभवला.सहभागी स्‍पर्धकांना राष्‍ट्रवादीचे शहराध्‍यक्ष नितीन धांडे व नगरसेविका मिनाक्षी धांडे यांच्‍या तर्फे फराळाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.त्यानंतर तीन भाग्यवान विजेते काढण्यात आले .त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले .शिवाय स्पर्धातील ६ सर्वात कमी वयाचे व सहा सर्वाधिक जेष्ठ अशा बारा स्पर्धकांचा गौरव करण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती फालक, सीमा पाटील,अलका भटकर,ज्योती सोनवणे,डॉ. शीतल चोरडिया,सरोज शुक्ला,पुनम कुलकर्णी,तृप्ती नगर नाईक ,जोस्त्ना पाटील ,सोनाली पाटील, सोनाली वारके ,हर्षा लोखंडे,सुवर्णा पाटील,चारुलता अजय पाटील,संजीवनी लाहोटी,दीपा अग्रवाल,निधी अग्रवाल,ममता ठाकूर,कांचन पाटील ,कंगना मनवानी,अनिता पाटील या महिला सदस्यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *