भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जामनेर रोड वरील डीवायएसपी कार्यालयाच्या समोरच असलेल्या साईबाबा मंदिरात शुक्रवार ७ रोजी पहाटे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यात त्यांना यश आले नाही.
मंदिराचे पुजारी संजय हरी जोशी यांनी सकाळी पाचला मंदीराचा दरवाजा उघडल्यावर त्यांना तुटलेली कडी आणि न उघडलेला दरवाजा दिसून आला. त्यांनी तात्काळ नगरसेवक निर्मल कोठारी यांना माहिती दिली. कोठारी यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चोरीच्या प्रयत्नात दरवाजाचे झालेले नुकसान पहाणी केली. शुक्रवारी 2.36 वाजता शेजारीच असलेल्या आयटीआयमधून चोरट्याने मंदिर परीसरात उडी घेत दक्षिण भागातील दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. सीसीटीव्हीत चोरट्याची छबी कैद झाली असून पोलिसांनी फुटेजवरून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.



