महिलांनी स्वावलंबी व जागरूक राहून विषमता दूर करावी -डॉ अलका नाईक

भुसावळ (प्रतिनिधी )-
महिलांनी स्वावलंबी होऊन जागरूक राहून विषमता दू4र केली पाहिजे तसेच महिलांनी आपल्या कार्यक्षमतेवर व गुणवत्तेवर सर्व स्थरातील विषमता दूर केली पाहिजे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त समाजातील स्त्री पुरुष विषमतेवर भाष्य करतांना येथील प्रसिद्ध शल्य विशारद आणि भुल तज्ञ अलका नाईक यांनी व्यक्त केले . भुसावळ रेल्वे विभागातर्फे महिला दिनाच्या निमित्ताने सप्ताह साजरा करण्यात येत आहे यावेळी महिलांसाठी येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ नाईक पुढे म्हणाल्या की , महिलांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे ज्यामुळे शिक्षणातील भेदभाव दूर होतील, आर्थिक स्वावलंबन स्त्री -पुरुषांतील आर्थिक विषमता दूर करेल. तसेच प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे , प्रत्येक स्त्रीचा निरोगी आणि निरामय जीवन हा अधिकार आहे. मला माझ्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही ही सबब टाळली पाहिजे. यावेळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ प्रदीप नाईक आवर्जून उपस्थित होते यावेळी त्या म्हणाल्या की हीच खरी समानता पती पत्नीने एकमेकांची सोबत करणे एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे एक दुसऱ्याला मानसन्मान देणे हे आवश्यक आहे. तसेच ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या तसेच विवेक कुमार गुप्ता डी आर एम, मनोज कुमार सिन्हा ए डी आर एम, एन डी गांगुर्डे सिनि डी पी ओ तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *