जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने भुसावळच्या महिलांचा गुण गौरव

भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गुण गौरव 8 रोजी भुसावळ येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे .
ज्या महिलांनी त्यांच्या कुटुंबाप्रति, समाजाप्रति,शासनाप्रति मोलाचं योगदान दिलं आहे , मग त्या कुटुंब प्रमुख असो वा शासकीय कर्मचारी अशा महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगांव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *