भुसावळ तालुक्यातील शिक्षण विभाग विविध कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर – मनीषा पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-
विद्यार्थ्यांच्या गुणात्मक, क्रीडात्मक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील शिक्षकांसाठी अद्यावत ग्रंथालय, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारा एकमेव भुसावळ तालुका असून यासाठी या विभागाचे अधिकारी नेहमीच प्रयत्नशील असतात अशा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन भुसावळ पंचायत समितीचे सभापती मनीषा पाटील यांनी केले
तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले या कार्यक्रमांमधून पहिल्या तीन क्रमांकाचे कार्यक्रमांचा एकत्रित तालुकास्तरीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे बालरंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने संतोषीमाता हॉलमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
त्या म्हणाल्या की आजच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटमुळे प्रचंड प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे पण ते एकमेकांपासून दुर जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील ज्ञानाचा दुरावा कमी होत आहे आणि याच दृष्टिकोनातून शिक्षक देखील आपले ज्ञान अद्ययावत करीत आहे ही बाब गौरवास्पद असून भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मधील शैक्षणिक गुणवत्तेसह भौतिक सुविधा देखील चांगल्या झालेले आहेत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करण्यात आले यानंतर दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रभारी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान म्हणाले की विद्यार्थ्यांन सोबतच शिक्षकांना देखील आपल्या तालुक्यातील इतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद घडवता यावा ग्रामीण भागातील मुलांना तालुक्याला येऊन याठिकाणी इतरांसोबत माहितीची देवाण घेवान करता आली पाहिजे तसेच विविध कला गणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत
या कार्यक्रमाला उपसभापती वंदना उन्हाळे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे गट शिक्षणाधिकारी तुषार प्रधान शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण केंद्रप्रमुख नलिनी झांबरे बी डी बोदडे संजय श्रीखंडे आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात 64 तालुक्यातील शाळांनी समूहनृत्य, एकल नृत्य, नाटिका, मूक नाटिका, सादर केलेत परीक्षक म्हणून विजय चौधरी मनोज कुलकर्णी रमाकांत भालेराव डी एम हेलोडे यांनी काम केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपक पाटील व निशा पाटील यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक पतपेढी चे संचालक प्रदीप सोनवणे डॉ प्रदीप साखरे तज्ञ शिक्षक संजय गायकवाड समाधान जाधव विलास तायडे यांनी परिश्रम घेतले
विजय गट पुढील प्रमाणे
समुहनृत्य गटात
प्रथम जिल्हा परिष शाळा तळवेल ( शेतकरी नृत्य), द्वितीय – जिल्हा परिषद शाळा चोडवड ( धुमरनृत्य), तृत्तीय – जिल्हा परिषद शाळा, वांजोळा ( कोळीवा्ड्याची शान),
वैयक्तीक नृत्य-
प्रथम : जिल्हा परिष शाळा मोंढाळ, द्वितीय – जिल्हा परिष शाळा, कुऱ््हे, तृत्तीय – जिल्हा परिष शाळा पिंपळगांव
नाटक –
प्रथम – जिल्हा परिषद शाळआ कुऱ््हे उर्दु, द्वितीय – जिल्हा परिष शाळा शिंदी, तृत्तीय – जिल्हा परिषद शाळा, तळवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *