भुसावळ (प्रतिनिधी )-
थंडीमध्ये गरम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करून स्थानिक तापमानाच्या २० डिग्री पर्यंत नियंत्रित राहू शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन भारतीय लष्कराला हिमालयीन व थंड प्रदेशात उपयुक्त ठरणारे “सोलर पॉवर मड हाऊस” या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय भुसावळच्या सिव्हिल विभागाच्या अजयराजे कडू पाटील, शुभम जगदीश बारी, शुभम प्रकाश नेमाडे , चेतन अनिल चौधरी, अजय गोविंदा पाटील, देविश्री विजय सोनवने, निकिता तामचद खोब्रागडे, सायली राजेंद्र चौधरी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या प्रतिष्ठा श्रीवास्तव, दिव्या शर्मा या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाला मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा अनिल डी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते एआयसीटीइच्या
विश्वकर्मा पुरस्कार नुकताच दिल्लीत दिला गेला.
या प्रकारातील पुरस्कारात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक आला आहे.
विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, प्रा.सुधीर ओझा, डॉ. दिनेश पाटील, प्रा.अजित चौधरी यांनी अभिनंदन केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मानव संसाधन विकास मंत्रालय, सरकार. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांचे विद्यार्थी आणि संस्थांसाठी “एआयसीटीई-विश्वकर्मा पुरस्कार -२०१९” स्पर्धा घेतली होती.
२३७२ राष्ट्रीय संघातून दुसरा क्रमांक:
भारतातील विविध संस्थांच्या २३७२ संघांनी आपले प्रकल्प सादर केले. मूल्यमापनाच्या तीन टप्प्यांनंतर, एआयसीटीई नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात आणि प्रदर्शनात त्यांचे नमुना प्रदर्शित करण्यासाठी ११७ संघांची निवड करण्यात आली. शेवटी, ८ वेगवेगळ्या उप-श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी परीक्षकांनी २३ संघांची निवड केली त्यात महाविद्यालयाचा दुसरा क्रमांक आला, त्यांना ३१००० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान: प्राचार्य सिंह
मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण वैज्ञानिक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वाढविण्यासाठी या पुरस्कारांची स्थापना केली गेली आहे. तरुण विद्यार्थ्यांना आणि संस्थांना विशिष्ट कार्यप्रणालीत त्यांची कामगिरी वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरणा देणे जेणेकरून संपूर्णपणे देशाच्या वाढीस आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी असे पुरस्कार उपयुक्त ठरतात असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले.




