सुरवाडा येथील तरुणाचे गळफास लावून संपवली जीवनयात्रा ; कारण अस्पष्ट

बोदवड – तालुक्यातील सुरवाडा बुद्रुक येथे दिनांक ४ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेश समाधान उर्फ दगडू गणथळे (वय,२२ रा.सुरवाडा बु ता.बोदवड) या तरुणाने सुरवाडा बु येथील शेत शिवारातील व दगडू चावदास चौधरी यांच्या मालकीच्या शेताच्या बांधावर लिंबाच्या झाडाला लटकून दोराच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडली आहे.या प्रकरणी बोदवड पोलीसात संजय पंडित तेली (वय,३२ रा.सुरवाडा बुद्रुक ता.बोदवड ) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ.वसंत निकम करीत आहेत.
मयत तरुण राजेश याने ही टोकाची भूमिका का घेतली? यांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *