रजा़ हुसैन उर्दू प्रायमरी स्कूल मध्ये वार्षिक बक्षीस वितरण संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
खडका रोड येथील रजा़ हुसैन उर्दू प्रायमरी स्कूल मध्ये नुकत्याच वार्षिक मैदानी खेळ स्पर्धा संपन्न झाल्या . यामध्ये अनुक्रमें प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सर्टिफिकेट आणि पदक देउन गौरव करण्यात आला . प्रसंगी विद्यार्थ्याचे प्रोत्साहन
वाढवीण्यासाठी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रमाणपत्र व पदक (मेडल ) देवून कौतुक करण्यात आल्याने पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले .
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अल्हाज शेख मोहम्मद इस्माईल सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री मोहम्मद वाजीद , वसीम , मुबारक , नाज़िम , अफ़ज़ल , अज़रा , ईरम सबा , सददाम खाटीक ( पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वितेसाठी अफसर मनियार सर, रोज़मिन मॅडम, साजेदा पठाण मॅडम, नाज़नीन खान मॅडम, शाहिन शाह मॅडम, हिना मॅडम, नजमा मॅडम, ज़ाकिर खान, यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले .
सुत्रसंचालन साजेदा पठाण यांनी केले तर आभार अफसर मनियार सर यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांसह मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *