भारतीय रेल्‍वे स्‍तरिय चित्रकला स्‍पर्धेसाठी तिघांची निवड.

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आंतर विभागीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या आपल्या कामातील व्यस्तते मध्येही आपली कला जोपासता यावी ह्यासाठी राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याची प्राथमिक फेरी भुसावळ येथे आजोजित करण्यात आली होती. यात मध्य रेल्वेच्‍या मुंबई, नागपूर,सोलापूर,भुसावळ या मंडळातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या मधून निवडलेले तीन स्पर्धक वाराणसी येथे होणाऱ्या भारतीय रेल्वे स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. ह्या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे प्रथम चंद्रप्रकाश, द्वितीय राजेंद्र जावळे व तृतीय उदय कुमार यांनी पटकावले. स्पर्धेचे परीक्षक जी.एस. सरनाईक,प्रकाश दलाल आणि सतीश कुलकर्णी हे होते विजेत्यांवर सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे चित्रप्रदर्शन कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे.आज दि.३ मार्च रोजी विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता,अप्‍पर विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक मनोजकुमार सिन्हा,वरिष्‍ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे तसेच इतर रेल्वे शाखा अधिकाऱ्यांनी भेटी दिल्‍या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्‍यक कार्मिक अधिकारी आर.एच.परदेशी व सर्व कार्मिक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *