राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियानंतर्गत मोफत शिबिर.

भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्‍ट्रीय शहरी आरोग्‍य अभियानंतर्गत महात्‍मा फुले आरोग्‍य केंद्र व तालुका आरोग्‍य कार्यालयाच्‍या संयुक्‍त विद्‍यमानाने महात्‍मा फुले आरोग्‍य केंद्रात मोफत आरोग्‍य निदान शिबिराचे आयोजन आज दि.३ मार्च रोजी करण्‍यात आले होते.
या शिबीराचे उद्‍घाटन माजी नगराध्‍यक्ष युवराज लोणारी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.यावेळी सभापती प्रतिभा वसंत पाटील,वैद्‍यकिय अधिकारी डाॅ.अतिया खान,डाॅ.तौसिफ खान उपस्‍थित होते.या शिबीरात ४०० लाभार्थींनी लाभ घेतला. डाॅ.सुमित महाजन,डाॅ.गौरी खानापुरकर,डाॅ.शगुफ्‍ता खान यांनी रूग्‍णांच्‍या विविध आजारांची तपासणी केली.शिबीरात मोफत रक्‍त तपासणीही करण्‍यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *